जिल्हा परिषदेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
schedule31 May 26 person by visibility 41 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन : जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकल्याण, सुशासन व लोकहितासाठी केलेल्या कार्याचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.