Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेतर्फे कर्मचाऱ्यांना २५ टक्क्यांहून अधिक पगारवाढशिवसेना नेहमीच मराठा समाजासोबत, समाजाला न्याय देण्याची भूमिका - मंत्री उदय सामंतविधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम जिल्हा परिषदेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरीजयप्रभा स्टुडिओमधून प्रचाराचा शुभारंभ, संग्राम भालकर अपक्ष म्हणून रिंगणात हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेतर्फे कर्मचाऱ्यांना २५ टक्क्यांहून अधिक पगारवाढ

schedule01 Jun 26 person by visibility 18 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेने कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा निर्णय घेतला. संस्थेच्या नऊ शाखांमधील सर्व कर्मचाऱ्यांना २५ ते ३० टक्के पगारवाढ मंजूर केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.  ही वाढ कर्मचाऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात केलेला व्यवसाय, संस्थेने मिळविलेला नफा तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याचे वैयक्तिक योगदान यांचा विचार करून मासिक बैठकीत सविस्तर चर्चा केल्यानंतर मंजूर करण्यात आली.

 पगारवाढ एक एप्रिलपासून लागू करण्यात आली असून, फरकासह वाढीव रक्कम मे महिन्याच्या वेतनात समाविष्ट करण्यात आली आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण कवचाचा लाभ देऊन त्यांना कायम करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक सुरक्षेची जबाबदारी संस्था अधिक सक्षमपणे पार पाडणार आहे. याशिवाय पात्र कर्मचाऱ्यांना हाऊसिंग लोनचा लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ सदस्य, कर्मचारी प्रतिनिधी तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून भविष्यातही कर्मचारी कल्याणाला प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes