महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग यांचे सुपुत्र कै. जयवंत उर्फ नानासो जरग मितभाषी, उमदे राजकारणी, समाजशील, विचारवंत आणि शिक्षणप्रेमी असे व्यक्तिमत्व होते. जरग विद्यामंदिर स्थापनेमध्ये ते अग्रभागी होते, तसेच गेली अनेक वर्ष शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून शाळेच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. ’’अशा शब्दांत श्रद्धांजली वाहण्यात आली.
जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर येथे शोकसभा आयोजित केली होती. जरगनगर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नीता ठोंबरे या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. शोकसभेत प्रारंभी, मौन बाळगून नानासो जरग यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी श्रीमती विमल गवळी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, ज्येष्ठ शिक्षक शिवाजी मेथे-पाटील, सुनील पाटील, मनोहर सरगर यांनी मनोगतातून नानांना आदरांजली वाहिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संध्या देवडकर, समिती सदस्य, स शिक्षक सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.