योगदान विसरू नका, महापालिकेत शिवसेना ठाकरे पक्षाला हव्यात 33 जागा
schedule06 Dec 25 person by visibility 32 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. कोल्हापूर महापालिकेसाठी शिवसेनेला 33 जागा हव्यात. शिवसेनेने यापूर्वी महाविकास आघाडीसाठी मोठे योगदान दिले आहे. ते योगदान महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी विसरू नये अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मांडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी त्यांची शाहू स्मारक भवन येथे पत्रकार परिषद झाली . शहर प्रमुख सुनील मोद, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, मनजित माने आदींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख इंगवले यांनी महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहे. असे स्पष्ट केले. ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत. आता उपलब्ध माहितीनुसार 33 ठिकाणी शिवसेनेचे अतिशय प्रभावी उमेदवार आहेत. महाविकास आघाडीला शिवसेनेने नेहमीच योगदान दिले आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तत्कालीन उमेदवार जयश्री जाधव, लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज तर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुवकीत राजेश लाटकर यांच्या प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोठे योगदान आहे. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींना या योगदानाचा विसर पडू नये. महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी शहरांमध्ये विकास कामासाठी जो निधी दिला त्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागात विकास कामासाठी किती निधी उपलब्ध करून दिला ? याचा विचार करावा. दुजाभाव होऊ नये. शिवसेनेचा वापर कोण करत आहे का ?याचाही विचार करावा असेही इंगवले यांनी स्पष्ट केले.