Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोगसंजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप मोरे, व्हाईस चेअरमनपदी जयकुमार रेळेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर कृष्णराज महाडिकांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक !

जाहिरात

 

सई खराडे, शिवतेज खराडे, इंद्रजीत आडगुळे शिवसेनेत ! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश !!

schedule07 Dec 25 person by visibility 546 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मातब्बर उमेदवारांच्या शोधात असलेल्या पक्षाने आता थेट इन्कमिंगवर भर दिला आहे. कोल्हापुरात शिवसेनेने पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का दिला. माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव इंद्रजीत आडगुळे  यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच माजी महापौर सई खराडे व त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला. ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खराडे व अआडगुळे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला यावेळी राज्य  नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार सुजित मिंणचेकर आदी उपस्थित होते. आमदार क्षीरसागर यांनी या कामी पुढाकार घेतला होता. कोल्हापुरातील महापालिकेच्या निवडणुकीत यंदा महायुतीची सत्ता आणायची असा संकल्प नेते मंडळींनी केला आहे. सक्षम उमेदवारांचा पक्ष प्रवेश सुरू आहे. काँग्रेसकडून महापौर झालेले आडगुळे व खराडे यांचे वारसदार आता शिवसेनेचे दाखल झाले आहेत. शिवाय माजी महापौर सई खराडे यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. 2005 मध्ये त्या काँग्रेसकडून निवडून आल्या  होत्या. महापौरपदावर असतानाच त्यांनी जनसुराज पक्षात प्रवेश केला होता. सई खराडे यांनी दोनदा महापालिकेवर नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेही चाचपणी केली होती. आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे हे इच्छुक आहेत तसेच माजी महापौर महादेवराव अडगुळे यांचे चिरंजीव इंद्रजीत हे देखील महापालिका निवडणूक लढवणार आहेत. महादेवराव आडगुळे यांनी 1999 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती ळ. त्यावेळी त्यांनी दोन नंबरची मते मिळवली होती. दरम्यान शिवतेज खराडे व इंद्रजीत आडगुळे या दोघांनाही उमेदवारीचा शब्द दिल्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश झाल्याचे वृत्त आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes