सोमवारपासून फूटपाथवरील अतिक्रमण हटणार, सर्किट बेंचचा आदेश! महापालिकेची कारवाई!!
schedule06 Dec 25 person by visibility 38 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर कोल्हापूर शहरातील फूटपाथवरील वाढत्या अतिक्रमणावरून सर्किट बेंचने महापालिकेला स्पष्ट आदेश दिले आहेत. रहदारीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिका सोमवार आठ डिसेंबर 2025 पासून फूटपाथवरल अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेणार आहे
रस्ते दुरुस्तीविषयक प्रलंबित याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हा आदेश दिला आहे. महापालिकेने जाहीर केले आहे की की शहरातील मुख्य रस्त्यांवरील फुटपाथवर बांधकाम साहित्य, मातीचे ढिगारे ठेवणे तसेच बस स्टँड, धार्मिक स्थळे, शाळा, रुग्णालये, न्यायालये व सरकारी कार्यालये अशा अतिगर्दीच्या ठिकाणी चहा–नाश्ता, फळभाजी किंवा कोणताही किरकोळ व्यवसाय करणे पूर्णपणे बंदीचे आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सर्व फेरीवाले, हातगाडी फळ विक्रेते, चहा–नाश्ता हातगाडी चालक आणि इतर छोट्या विक्रेत्यांना फुटपाथवरील साहित्य तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या सोमवारपासून अशा प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच त्यांचे साहित्य जप्त केले जाईल. शहरातील वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांची चालणे–वावर सुरक्षित रहावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्य वतीने करण्यात आले आहे.