जिपच्या ११०० शाळा बंद, प्राथमिकचे जवळपास सात हजार शिक्षक आंदोलनात
schedule05 Dec 25 person by visibility 20 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :सक्तीच्या टीईटी विरोधात पुकारलेल्या शाळ बंद आंदोलनात जिल्हा परिषदेच्या ११०० शाळा सहभागी झाल्या. जिल्हा परिषद शाळेतील ५५२० शिक्षक आंदोलनात होते. तसेच खासगी प्राथमिक शाळेतील ८७१ तर नगरपालिका व महापालिका शाळेतील ६२७ शिक्षकांचा सहभाग असल्याची माहिती आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मिळून १२००० हून अधिक शिक्षक हे शाळा बंद आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे. टीईटी सक्तीच्या विरोधात शुक्रवारी, पाच डिसेंबर रोजी शाळ बंद आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो शिक्षक सहभागी झाले. जिल्हा परिषदेच्या ११०० शाळा, खासगी प्राथमिकच्या १२८ तर नगरपालिका व महापालिकेच्या ६४ शाळा बंद राहिल्या. प्राथमिक शिक्षण विभागाकडील माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या ८५७ शाळा, खासगी प्राथमिकच्या ११९ तर नगरपालिका व महापालिकेच्या मिळून ४५ शाळा चालू होत्या. दरम्यान आंदोलनात सहभागी शिक्षकांचा एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल असा इशारा शिक्षण संचालकांनी दिला होता. मात्र त्या आदेशाला न जुमानता हजारो शिक्षक शाळा बंद आंदोलन करत मोर्चात सहभागी झाले. आंदोलनात महिला शिक्षकांची संख्या मोठी होती.