वर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा
schedule18 Oct 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ग्रंथाली आणि राजकमल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षा अशोक गगराणी यांनी मराठीतून हिंदीत अनुवादित केलेल्या चौदा पुस्तकांचे प्रकाशन व त्यांच्याशी संवाद असा संयुक्त् कार्यक्रम रविवारी (१८ ऑक्टोबर २०२६) आयोजित केला आहे. रेसिडेन्सी क्लब येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होत आहे. डॉ., दामोदर खडसे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. याप्रसंगी संपादक हुबनाथ पांडे, अशोक माहेश्वरी, रमन मिश्रा, राकेश वर्मा, मराठी लेखक अरुण पुराणिक आणि संजय कृष्णाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
वर्षा अशोक गगराणी या मूळच्या इस्लामपूरच्या. माहेरचे आडनाव राठी. वडिलांचे थिएटर. यामुळे सिनेमा क्षेत्राशी त्या लहानपणापासूनच निगडीत. सिनेमाची आवडही. त्या शिक्षिका होत्या. हिंदी विषयातून पदव्युत्तर शिक्षक घेतले. एमए हिंदी असलेल्या वर्षा गगरानी या राष्ट्रभाषा पंडित आहेत.त्यांनी अनुवादित केलेल्या चौदा पुस्तका बहुतांश पुस्तके ही सिनेमाशी निगडीत आहेत. लेखक अरुण पुराणिक, सुधा हुजुरबाजार तुंबे, संजय कृष्णाजी पाटील यांच्या पुस्तकांचा गगराणी यांनी हिंदीत अनुवाद केला आहे. ‘बी आर चोपडा का दौर, यादें फिल्मस्तान की, मुंबई के सिनेमाघर, हमारी याद आएगी, सिनेमा मे दृश्यकला, बेस्ट ऑफ व्ही शांताराम, आधुनिक बारहमासा, रंग जीवन के, सप्तरंगी कोरिया, शून्य काल, दशक्रिया की चित्रकथा, माँ बेटियाँ, गुमशुदा कविताओंकी नोटबुक, गगन घटा घहरानी’ या पुस्तकांचा समावेश आहे.
या चौदा पुस्तकांसह या कार्यक्रमात संजय कृष्णाजी पाटील यांच्या साहित्याचा डॉ. सुलभा कोरे यांनी, ‘लेझिम खेलनेवाले बच्चे’या नावांनी केलेल्या अनुवादित पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच हुबनाथ पांडे यांनी, संजय पाटील यांच्या दोन पुस्तकाचा ‘युद्ध पर्व, ध्वस्त वर्तमान की दसों दिशाएँ’हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन आहे. साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरक, कार्यक्रम संयोजक धनश्री धारप व गगराणी कुटुंबीय यांनी केले आहे.