बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना पकडले, दोन लाख 28 हजार रुपयांच्या नोटा जप्त
schedule27 Aug 22 person by visibility 399 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
गडहिंग्लज पोलिसांनी सापळा रचून बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून दोन लाख 28 हजार सहाशे रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी महागाव हद्दीत ही कारवाई केली.
महागाव परिसरात बनावट नोटा खपवण्यासाठी संशयित येणार आहेत, अशी माहिती गडहिंग्लज पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचला मोटरसायकल वरून आलेल्या संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अब्दुल रजाक अब्बासाहेब मकानदार (वय 25 रा. एकसंबा रोड, मेहबूबनगर, चिकोडी जि. बेळगाव) याच्याकडून पाचशे रुपयांच्या 75 हजार रुपये नोटा मिळाल्या अनिकेत शंकर हुले (वय 20 रा.महागाव) याच्याकडे दोनशे रुपयेच्या 67 हजार किमतीच्या बनावट नोटा मिळाल्या. तर संजय आनंदा वडर (वय 35 रा. शिक्षक कॉलनी नेसरी) याच्याकडून शंभर रुपयाच्या 56 हजार 100 रुपये किमतीच्या बनावट नोटा मिळाल्या पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली फौजदार विक्रम वडणे, हेड कॉन्स्टेबल बाजीराव कांबळे, राजकुमार पाटील ,नामदेव कोळी, दादू खोत, दीपक किल्लेदार, गणेश मोरे यांनी कारवाईत भाग घेतला.