+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत, जुना बुधवार पेठ पराभूत adjustआजरीज इको व्हॅलीचे उद्घाटन समारंभ उत्साहात adjustखस्ता मातीशी नाळ जोडणाऱ्या ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी कादंबरी adjustआसगावकर यांच्या फंडातून वसतीगृह, निवासी शाळांना प्रिंटर वाटप adjustशिवसेना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी महापालिकेवर धडक आंदोलन adjustहसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखेंचा पुढाकार adjustआमचं ठरलंयला उत्तर सभासदांनी ठरवलंयनी ! राजारामच्या आखाड्यात महाडिक –पाटलांचे शड्डू लागले घुमू !! adjustआमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून : सत्यजित जाधव adjustगावकऱ्यांनी गिरवले अर्थकारणाचे धडे : घोडावत विद्यापीठाचा 'अर्थ प्रबोधन' कार्यक्रम adjustशिवाजी विद्यापीठाला भुयारी मार्गासाठी आठ कोटी ४८ लाखाचा निधी मंजूर
Screenshot_20230226_214758
Screenshot_20230217_165558
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule30 Jan 23 person by visibility 520 categoryसामाजिक
हजारो मूर्ती, शेकडो कारागीर आणि पायाला भिंगरी बांधलेले स्वामीजी!!
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शेकडो एकर जमिनीवर उभा राहत असलेल्या वेगवेगळ्या संकल्पना, पंचमहाभूतांची ओळख करून देणाऱ्या प्रतिकृती, कारागिरांच्या सुबक कलाकृतीतून साकारणाऱ्या वेगवेगळ्या विषयावर आधारित मूर्ती आणि सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवात कोणत्याही प्रकारची कसर राहू नये म्हणून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत मार्गदर्शन करणारे पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, हे चित्र आहे कणेरी मठ परिसरातील. पायाला भिंगरी बांधल्यासारखे काडसिद्धेश्वर स्वामीजी महोत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत. भल्या पहाटेला त्यांच्या दिवसाला सुरुवात होते. दिवसभर मिनिटभराचीही उसंत न घेता स्वामीजी महोत्सवाच्या तयारीसाठी परिसरात भ्रमंती सुरू असते. कणेरी मठ येथे वीस ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव होत आहे. या महोत्सवसाठी विविध भागातील लाखो लोक सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये आकाश, पृथ्वी, वायू जल अशा पंचमहाभूत घटकांशी निगडित संकल्पना केंद्रस्थानी आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, संस्कार, शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये सामावून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
या महोत्सवासाठी कणेरी मठ परिसरात भारतीय संस्कृतीची ओळख दर्शवणारी नगरी वसत आहे. कणेरी मठाच्या जवळपास साडेपाचशे एकर परिसरात पंचमहाभूतांच्या प्रतिकृती, ग्राम संस्कृती, कृषी संस्कृती साकारत आहे. प्रत्येक घटकाशी निगडित आणि त्या घटकाशी पूरक मूर्ती यामुळे शिव मंगलम महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती येथे अवतरत असल्याचे चित्र तयार झाले आहे. महोत्सवाच्या सात दिवसाच्या कालावधीत लाखो नागरिक या ठिकाणी भेट देणार आहेत. या कालावधीत कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये या अनुषंगाने आहार, निवास, पाणी, रस्ते हे सगळ्या घटकांची सोय करण्यात येत आहे.
महोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या नियोजन कमिट्या तयार केले आहेत. प्रत्येकावर जबाबदारी सोपवलेली आहे. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार सगळ्या कामांची पूर्तता होत आहे. प्रत्येक काम सुबक नियोजनबद्ध झाले पाहिजे हा स्वामीजींचा कटाक्ष आहे. भल्या पहाटे त्यांचा दिनक्रम सुरू होतो. सकाळी आठ वाजता नियोजन कमिटीसोबत बैठक, दिवसभराच्या कामाचे नियोजन यासंबंधी चर्चा होते. वेगवेगळ्या कामासाठी कारागिरापासून तज्ञांच्या पर्यंत सर्वांशी संवाद साधत, कधी मार्गदर्शन करत कामाला गती देत असतात. सुमंगलम महोत्सवाच्या तयारीचा एक भाग म्हणून या परिसरात वेगवेगळी कामे सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी कोणतीही कसर राहू नये याकडे ते लक्ष घालतात. सूचना करतात. जबाबदारी सोपविण्यात आलेल्या व्यक्तीकडे त्या कामाची चौकशी करतात. प्रत्येकाचा विषय वेगळा, प्रत्येकाला योग्य त्या सूचना करून महाराज मार्गस्थ होतात. सारा परिसर फिरून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतात. एकानंतर एक अशा पद्धतीने कामांची सोडवणूक सुरू असते. लोक भेटत असतात कोणाला आशीर्वाद देत, कोणाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याची पद्धत सगळ्यांचा हुरूप वाढवणारी असते. स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक घटक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सरसावला आहे.