गोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा
schedule04 Dec 25 person by visibility 2 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने संघाने आपल्या दिव्यांग कर्मचार्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान व्यक्त केला. संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग कर्मचार्यांचे कौतुक करण्याची संधी मला मिळाली, हा दिवस समाजात दिव्यांग व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आणि त्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी साजरा केला जातो. दिव्यांग कर्मचारी कोणत्याही संस्थेचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना समान संधी, प्रोत्साहन व सहकार्य मिळाल्यास ते अधिक प्रभावीपणे कार्यरत राहतात.” याप्रसंगी संघाचे संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, शशिकांत पाटील–चुयेकर, बयाजी शेळके उपस्थित होते.