Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोगसंजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप मोरे, व्हाईस चेअरमनपदी जयकुमार रेळेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर कृष्णराज महाडिकांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक !

जाहिरात

 

महाराणी ताराराणी पुरस्कार मेजर स्वाती संतोष महाडिकांना जाहीर

schedule04 Dec 25 person by visibility 273 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : करवीर राज्य संस्थापिका, स्वराज्यरक्षिका छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी महासंघाच्यावतीने दहा डिसेंबर 2025 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महाराणी ताराराणी यांच्या महापराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम होत असून याप्रसंगी मेजर स्वाती संतोष महाडिक यांना 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार 2025' प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली. दसरा चौक येथील राजर्षी  शाहू स्मारक भवन येथे सकाळी 11 वाजता  पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेजर जनरल एम एन काशीद व जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. कर्नल अमरसिंह सावं , कर्नल  विक्रम नलावडे,  शिवाजीराव परळीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मेजर स्वाती महाडिक या जम्मू काश्मीर येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सातारा येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर पत्नी आहेत. कर्नाल संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी स्वाती महाडिक या सैन्य दलात भरती झाल्या. त्यांना महाराणी ताराराणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचे 'महाराणी ताराबाई : एक अभ्यास' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला शैलजा भोसले , सी. एम. गायकवाड , चंद्रकांत चव्हाण,  उदय देसाई,  बबनराव रानगे,  एम डी देसाई,  प्रकाश पाटील,  विजय पाटील, शरद साळुंखे, संजय कांबळे, अवधूत पाटील आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes