महावीर उद्यानात सहा- सात डिसेंबरला पुष्पप्रदर्शन
schedule04 Dec 25 person by visibility 23 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गार्डन्स क्लब व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सहा व सात डिसेंबर 2025 रोजी 55 वे पुष्पप्रदर्शन आयोजित केले आहे. महावीर गार्डन येथे हे प्रदर्शन होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्याने, तसेच बगीचाला लागणाऱ्या सर्व साहित्यांची रेलचेल असेल अशी माहिती क्लबच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी व सचिव सुप्रिया भस्मे यांनी दिली.
या प्रदर्शनाची सुरुवात शनिवारी, सहा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता पुष्प स्पर्धेने होईल. ज्यामध्ये स्पर्धक आपल्याकडील फुललेले गुलाब, झेंडू, निशिगंध, जरबेरा अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती प्रदर्शनात मांडतील. तज्ञ परीक्षकाकडून त्याचे परीक्षण होईल. त्यानंतर पुष्पप्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ होईल. उद्यान स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांचा बक्षीस समारंभ मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. तर उपायुक्त परितोष कंकाळ हे अध्यक्ष असतील. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून शांतादेवी डी. पाटील, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, राजेंद्र दोशी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान संध्याकाळच्या सत्रात प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्कीट स्पर्धा घेण्यात येईल. यानंतर बोटॅनिकल फॅशन शो होणार आहे. ज्या स्पर्धेमध्ये तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी सिनेतारका जुई पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवारी सात डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा आहे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एचपी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज हिराकांत पाटील यांच्या हस्ते होईल. जेष्ठ चित्रकार विलास बकरे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांची चित्रे 2027 कॅलेंडरसाठी निवडली जातील. संध्याकाळच्या सत्रात पृथ्वी आणि पर्यावरण या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धेतील निवडक व विजेते लघुपट पडद्यावर दाखवण्यात येणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या या पुष्प प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला शांतादेवी डी पाटील, शशिकांत कदम, सुभाषचंद्र अथणे, डॉ. रचना संपत कुमार, रवींद्र साळुंखे, प्राजक्ता चरणे आदी उपस्थित होते.