Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोगसंजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप मोरे, व्हाईस चेअरमनपदी जयकुमार रेळेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर कृष्णराज महाडिकांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक !

जाहिरात

 

लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! एस. एम. माळींना जीवनगौरव, अशोक राजाराम माळींना समाजभूषण पुरस्कार ! !

schedule04 Dec 25 person by visibility 218 categoryसामाजिक

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार हुपरी येथील चांदी उद्योजक एस. एम. माळी यांना तर समाजभूषण पुरस्कार निवृत्त सैनिक दुय्यम अधिकारी भारतीय सेनेचे अशोक राजाराम माळी यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण चौदा डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय वधू- वर व समाज मेळाव्यात करण्यात येणार आहे. राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह येथे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पुरस्काराचे वितरण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, अखिल भारतीय समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष विजयराव धुळूबुळू, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष किरण गवळी, उद्योजक अमोल राजमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या तयारीसाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यामध्ये मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, ज्येष्ठ संचालक तानाजी माळी, काशिनाथ माळी, सचिव राजाराम यादव, खजानिस किशोर माळी, अशोक माळी, शशिकांत माळी, बाळासाहेब माळी, राजू माळी, दयानंद माळी, महेश माळी, संतोष माळी, संजू कोरे यांच्यासह उपस्थित होते.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes