वाद्यांचा गजर, फुलांची उधळण आणि शाहू छत्रपतींचा जयजयकार !
schedule26 Mar 24 person by visibility 302 categoryजिल्हा परिषद
कोल्हापूर : वाद्यांचा गजर, फुलांची उधळण आणि शाहू छत्रपतींचा जयजयकार अशा जल्लोषी वातावरणात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचे स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती, कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी सांगवडेवाडी सांगवडेवाडी, गडमुडशिंगी, न्यू वाडदे, चिंचवाड अशा विविध गावांचा दौरा केला. या गावातील प्रचार दौऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करतानाच प्रचंड मताधिक्क्याने शाहू छत्रपतींना निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखविला. शाहू महाराज आगे बढो हम तुम्हारे साथ है, सतेज पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है, ऋतुराज पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणला. "जीवाचे रान करू पण शाहू छत्रपतींना निवडून आणू "अशी घोषणा आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील यांचे सांगवडेवाडी येथे आगमन झाले. ग्रामस्थांनी वाद्यांचा गजर करत त्यांचे स्वागत केले. गोल्डन मित्र मंडळाच्या सभागृहात मेळावा झाला. सरपंच सुदर्शन खोत, कुमार खुडे, पोपट सिद्धनेरले, ए डी माने, बाबासाहेब खोत, आप्पासाहेब माने, शितल खोत आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात समाविष्ट गावांनी नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. आमदार सतेज पाटील व माझ्यावर प्रेम केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत या गावाने महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना मोठे मताधिक्य द्यावे असे आवाहन केले. यानंतर सांगवडे येथे प्रचार दौरा झाला. येथे वाजत गाजत मिरवणूक निघाली. शाहू छत्रपतींनी ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानचे दर्शन घेतले. समाजमंदिराला भेट दिली. दिगंबर जैन मंदिरमध्ये मेळावा झाला.पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव पाटील, सरपंच रूपाली उत्तम कुंभार, उपसरपंच कल्पना बाजीराव देसाई, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना पाटील, राजगोंडा पाटील सर्जेराव कुराडे गौतम पवार अण्णासो पाटील, प्रकाश पाटील आदींचा यावेळी उपस्थिती होती. सांगवडे येथे यशराज घोरपडे, मंगला घोरपडे, आनंद महाराज सांगवडेकर, निरंजन सांगवडेकर यांनीही शाहू छत्रपतींचे स्वागत केले. यानंतर दौरा वसगडे येथे पोहोचला. धनगरी ढोल पथकाच्या वाद्यांच्या गजरात शाहू छत्रपतींचे स्वागत केले. त्यांनी श्री विठ्ठल बिरदेव मंदिर येथे दर्शन घेतले. यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथे नागरिकांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. सरपंच योगिता बागडी, पंचायत समितीचे माजी उपसभापती शोभा राजमाने, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे, गौतम कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सचिन कांबळे, बाळू गोविंदा कांबळे किरण गवळी आदींच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. आमदार पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ही निवडणूक भविष्याचा पाया रचणारी आहे. या निवडणुकीत समतेचा वारसा जपणाऱ्या शाहू छत्रपतींना निवडून देऊ या अशी साद घातली. शाहू छत्रपती यांनी, 'संविधान बदलण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो हाणून पाडला जाईल" असा इशारा दिला. नवभारत विकास सेवा सोसायटी येथे आयोजित मेळावा हा रावसाहेब पाटील, दीपक पाटील, डॉ.शीतल पाटील, डॉ. श्रीकांत चौगुले, सुनील पाटील, बाळासाहेब उपाध्ये यांच्या उपस्थितीमध्ये झाला.
गडमुडशिंगी येथे शाहू छत्रपती व आमदार ऋतुराज पाटील यांचे चौका चौकात स्वागत करण्यात आले फुलांची उधळण, विजयाच्या घोषणा आणि भगव्या टोपी परिधान करून कार्यकर्त्यांची मोटरसायकल रॅली असे चित्र या गावात होते. राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून शाहू छत्रपतींनी गडमुडशिंगी मधील दौऱ्याला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केले. महादेव मंदिर येथे मेळावा झाला. यावेळी बोलताना शाहू छत्रपतींनी, " संविधान वाचविणे म्हणजे लोकशाही वाचविणे होय. आणि लोकशाही वाचविणे म्हणजे हुकूमशाहीला हद्दपार करणे होय. समतेचा विचार सोबत घेऊन आपणाला वाटचाल करायचे आहे. महाविकास आघाडी सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारी आहे. या निवडणुकीत हाताला मतदान करून विजयी करा"असे आवाहन केले. महादेव मंदिरातील मेळाव्यात विविध समाजाने शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला. सरपंच अश्विनी अरुण शिरगावे, संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब माळी, प्रकाश घोरपडे, डॉ. अशोक पाटील, रावसाहेब पाटील, दादा पाटील, सचिन पाटील, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर, किसन ठमके, सुदर्शन पाटील, पोपट दांगट, सम्राट गोंधळी यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.........................
आजपर्यंत एकाही खासदाराचा निधी मिळाला नाही
काळम्मावाडी धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन मुडशिंगी नजीक न्यू वाडदे येथे करण्यात आले आहे. या ठिकाणी शाहू छत्रपतींनी भेट दिली. प्रभारी सरपंच दत्ता पाटील यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना दत्ता पाटील यांनी न्यू वाडदे वसाहत मध्ये आतापर्यंत एकही खासदाराचा निधी मिळाला नाही. शाहू छत्रपतींच्या उमेदवारीमुळे आमच्या अशा पल्लवीत झाले आहेत. शाहू छत्रपतींच्या माध्यमातून या भागासाठी निश्चितच निधी मिळेल असा आशावाद करताना शंभर टक्के मताधिक्य देऊ असेही स्पष्ट केले. आमदार ऋतुराज पाटील यांनी भाषण केले. यावेळी माजी सरपंच सचिन कुरले, कार्यकर्ते किरण पाटील, शिरीष माने उपस्थित होते. न्यू वाडदे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शाहू छत्रपतींनी या भागाच्या विकासासाठी निश्चितच मुदत करू अशी ग्वाही दिली. या दौऱ्यात गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील यांचा सहभाग होता.