सहकारातूनच मानवी जीवनाचा खऱ्या अर्थाने विकास : प्राचार्या वर्षा मैंदर्गी
schedule05 Jul 25 person by visibility 39 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मानवाची उत्पत्तीपासून आतापर्यंत जो विकास झालेला आहे तर केवळ सहकार या भावनेतून झालेला आहे असे प्रतिपादन देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ वर्षा मैंदर्गी यांनी केले. कॉलेजमधील अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त बोलत होत्या। त्या पुढे म्हणाल्या की मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सहकाराचे अनन्य साधारण महत्व आहे याच सहकाराच्या भावनेमुळे आज मानवाने अभूतपूर्व अशी प्रगती केलेली आहे. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर. एस .नाईक यांनी सहकाराचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर विशद केलं. यावेळी डॉ . एस. एफ. बोथीकर, डॉ. पी एम सोरटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.संग्राम पाटील यांनी स्वागत केले. प्रा. के डी. दिंडे यांनी आभार मानले यावेळी महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख ॲड.निरंजन सवने, डॉ मुजावर उपस्थित होते.