महापालिका सेवक पतसंस्थेत सत्तारुढ आघाडीची बाजी, दोन अपक्ष विजयी
schedule04 Nov 23 person by visibility 430 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची आर्थिक संस्था असलेल्या कामगार नेते रमेश देसाई कोल्हापूर महानगरपालिका नगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने तेरा जागा जिंकत बाजी मारली. विरोधी आघाडीतील दोन उमेदवारांनी धक्कादायक विजय मिळवल्याने दोन विद्यमान संचालकांचा पराभव झाला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या तिसऱ्या पॅनेलने (नारळ चिन्ह) दोन जागा जिंकून सत्ताधारी पॅनेलला धक्का दिल्याची चर्चा महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
सर्वसाधारण प्रतिनिधी गटात शहर अभियंता हर्षजीत घाटगे, अजित तिवले, धनंजय माने, प्रसाद माने ,विजय वणकुद्रे यांनी ५०० पेक्षा जास्त मते मिळवून पॅनलच्या विजयात दमदार कामगिरी केली. विरोधी आघाडीतील अपक्ष उमेदवार सुमित लुगडे यांनी ४५१ मते मिळवून विजय मिळवला. सत्ताधारी पॅनलची अनिल साळोखे पराभूत झाले.
इतर मागास प्रतिनिधी गटात विद्यमान संचालक उदय माने यांना पराभवाचा धक्का बसला.अशोक यादव यांनी ४६३ मते घेऊन विजय मिळवला. उमेदवारांना मिळालेली मते अशी,
सर्वसाधारण प्रतिनिधी विजयी उमेदवार - हर्षजित घाटगे 504, सचिन जाधव 467, अजित तिवले 574, अमर बागल 453, धनंजय माने 518, प्रताप माने 565, सुमित लुगडे 451, विजय वणकुद्रे 535, अभिजीत सरनाईक 441, राजू हजारे 463.
पराभूत उमेदवारांना मिळालेली मते अशी, सचिन इंगवले 334, मंदार कुलकर्णी 195 , अशोक खोत 187 ,दिलीप चव्हाण 109, प्रवीण डांगे 267, गणेश भोसले 299, राजेंद्र भोसले 211, विजय मिरजे 314 ,अनिल साळोखे 414, सुरेश सूर्यवंशी 256. एकूण मतदान 961 अवैध मते 80.
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी - सुधाकर चल्लावाड 605 विजयी, दत्तू पारधी पराभूत 262. इतर मागास प्रतिनिधी उदय माने 408 पराभूत, अशोक यादव 463 विजयी. भटक्या जाती विमुक्त जमाती प्रतिनिधी अशोक कुमार माने 660 विजयी, सुवर्णा शिरतोडे 210 पराभूत. महिला राखीव प्रतिनिधी
काळे विद्या 178 पराभूत, पाटील संगीता 448 विजयी, अनिता रुईकर 143 पराभूत, कल्पना शिरजवाडे 495 विजयी ,गीता सुतार 362 पराभूत.