महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अभियात्रिकीचे दर्जेेदार शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था म्हणजे येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय. गेली ४२ वर्षे येथे अभियांत्रिकीचे दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात एक नावाजलेले कॉलेज म्हणून ओळख झाली. संस्थेतर्फे शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जावा यासाठी केआयटी प्रशासनाच्या वतीने सातत्याने पुढाकार घेतला जातो. प्रतिवर्षी तरुण नवोदित प्राध्यापकांचे प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये आयोजित केले जाते. देशातील आयआयटी ,एनआयटी, परदेशी विद्यापीठामध्ये शिकवण्याचा अनुभव असलेले वरिष्ठ प्राध्यापक आता केआयटीचा भाग बनत आहेत. यामुळे केआयटीतील संशोधनाचा दर्जा आता आंतरराष्ट्रीय स्तराचा असेल असे संस्थेने म्हटले आहे.
इंटरनल कॅपॅसिटी बिल्डींग इनिशिएटिव्ह अंतर्गत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन व इंटरनल क्वालिटी अश्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी,डीन अकॅडमिक्स डॉ. अक्षय थोरवत ,डीन क्वालिटी अश्युरन्स डॉ. प्रशांत पवार ,ईएनटीसी विभाग प्रमुख डॉ. युवराज पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये काम केलेले डॉ.लिंगराज हादीमनी, आयआयटी मुंबई सारख्या प्रथित यश संस्थेतून आलेले विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर व डॉ. आदित्य खेबुडकर यांनी आपले विविध अनुभव प्राध्यापकांसमोर व्यक्त केले.
एनआयटीसारख्या दर्जेदार संस्थांमधून संशोधनात नाव कमावलेले २० प्राध्यापक केआयटीच्या सर्वच विभागात रुजू झाले आहेत. अशा संस्थांमधून आलेल्या प्राध्यापकांच्या माध्यमातून केआयटीमध्ये संशोधन कार्याला मोठी गती मिळणार असून याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे.विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा संशोधन वृत्ती निर्माण होऊन त्यांनाही राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यसंस्कृतीची माहिती होईल व तसेच अशा संस्थांबरोबर सामंजस्य करार करून त्या मधून विद्यार्थ्यांना तिथे काम करण्याची संधी मिळू शकते अशा प्रकारचे मत संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केले.