शिवसेना ठाकरे गटाने घेतली प्रशासकांची भेट
schedule25 Nov 25 person by visibility 8 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रारुप मतदार यादी निर्दोष करुनच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे महापालिका प्रशासकाकडे करण्यात आली. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले व शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदनही दिले. एकाच कुटुंबांतील नावे दोन वेगवेगळया प्रभागात दिसतात. ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरी मतदार यादीत समाविष्ठ आहेत. ग्रामीण भागातील नावे मतदार याद्यांमधून वगळली पाहिजेत. अंतिम मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी प्रारुप मतदार यादी निर्दोष करायला हवी. यासाठी महापालिकेने मतदार यादी दुरुस्तीसाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ मिळवावी अशा सूचना करण्यात आल्या. शिष्टमंडळात प्रतिज्ञा महेश उत्तुरे, शशिकांत बीडकर, विशाल देवकुळे, संदीप पाटील, मंजित माने, रिमा देशपांडे आदींचा सहभाग होता. मतदार यादीतील घोळ दुरुस्तीसाठी सॉफ्टवेअर तयार करा. हरकतीप्रमाणे घरोघरी जाऊन तपासणी करा. बनावट मतदान होणार नाही याची दक्षता घ्या अशी मागणी त्यांनी केली.