मतदार यादीतील चुका दुरुस्त करा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मागणी
schedule25 Nov 25 person by visibility 8 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करताना बेजबाबदारपणे काम झाले आहे. प्रत्येक प्रभागातील मतदार यादीमध्ये घोळ दिसत असून या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. तसेच चुका दुरुस्त होऊन अंतिम यादी जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वालील शिष्टमंडळाने निवदेन दिले. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचनासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे, त्याला मुदतवाढ मिळावी असे फरास यांनी सांगितले. शिष्टमंडळात माजी नगरसेवक संभाजी देवणे, सुनील पाटील, सतीश लोळगे, संदीप कवाळे, प्रकाश कुंभार, प्रकाश गवंडी, जहीदा मुजावर, युवराज साळोखे, सायली भोसले, पूजा साळोखे, हेमलता पोळ आदींचा सहभाग होता. मतदार यादीतील घोळ दुरुस्त करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी असेही निवेदनात म्हटले आहे.