जिल्हा परिषदेसाठी 241 उमेदवार! पंचायत समितीसाठी 455 जण रिंगणात !!
schedule27 Jan 26 person by visibility 74 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागेसाठी 241 उमेदवारी रिंगणात आहेत तर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 455 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी माघारीचा कालावधी 27 जानेवारी 2026 रोजी संपला. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली तसेच चिन्हांचे वाटप केले.जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकूण २४१ उमेदवार जिल्हा परिषदेसाठी तर ४५५ उमेदवार पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहेत. जिल्ह्यात अनेक मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होत आहेत ठिकठिकाणी स्थानिक आघाड्याने एकत्रित पॅनल तयार केले आहे.
शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात असून यामध्ये ९ पुरुष आणि ४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समितीसाठी एकूण १९ उमेदवार असून त्यात ११ पुरुष आणि ८ महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी २७ उमेदवार असून १३ पुरुष आणि १४ महिला आहेत. पंचायत समितीसाठी ४० उमेदवार रिंगणात असून त्यात २४ पुरुष आणि १६ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
हातकणंगले तालुका येथे जिल्हा परिषदेसाठी एकूण ४१ उमेदवार असून २५ पुरुष आणि १६ महिला उमेदवार आहेत. पंचायत समितीसाठी ७४ उमेदवार रिंगणात असून त्यात ३५ पुरुष आणि ३९ महिला उमेदवार आहेत. शिरोळमध्ये जिल्हा परिषदेसाठी २४ उमेदवार असून ८ पुरुष आणि १६ महिला आहेत. पंचायत समितीसाठी ४२ उमेदवार असून त्यात २३ पुरुष आणि १९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक ४५ उमेदवार रिंगणात असून ३५ पुरुष आणि १० महिला आहेत. पंचायत समितीसाठी ८१ उमेदवार असून त्यात ४० पुरुष आणि ४१ महिला उमेदवारांचा समावेश आहे.गगनबावड्यात जिल्हा परिषदेसाठी ५ उमेदवार असून ३ पुरुष आणि २ महिला आहेत. पंचायत समितीसाठी ८ उमेदवार रिंगणात असून ४ पुरुष आणि ४ महिला उमेदवार आहेत. राधानगरीत जिल्हा परिषदेसाठी २३ उमेदवार असून १३ पुरुष आणि १० महिला आहेत. पंचायत समितीसाठी ४६ उमेदवार असून त्यात २४ पुरुष आणि २२ महिला उमेदवारांचा समावेश आहे. कागल तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी १६ उमेदवार असून ४ पुरुष आणि १२ महिला आहेत. पंचायत समितीसाठी ३९ उमेदवार असून त्यात २२ पुरुष आणि १७ महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
भुदरगडमध्ये जिल्हा परिषदेसाठी १० उमेदवार असून विशेष म्हणजे सर्व १० उमेदवार महिला आहेत (पुरुष उमेदवार शून्य). पंचायत समितीसाठी २३ उमेदवार असून १४ पुरुष आणि ९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ८ उमेदवार असून हे सर्व ८ पुरुष आहेत (महिला उमेदवार शून्य). पंचायत समितीसाठी १८ उमेदवार असून १० पुरुष आणि ८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. गडहिंग्लजमध्ये जिल्हा परिषदेसाठी २० उमेदवार असून १५ पुरुष आणि ५ महिला आहेत. पंचायत समितीसाठी ३९ उमेदवार रिंगणात असून २० पुरुष आणि १९ महिला उमेदवार आहेत.चंदगड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ९ उमेदवार असून सर्व ९ महिला उमेदवार आहेत (पुरुष उमेदवार शून्य). पंचायत समितीसाठी २६ उमेदवार असून १४ पुरुष आणि १२ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणुकीचा एकूण सारांश:
• जिल्हा परिषद: एकूण २४१ उमेदवार (१३३ पुरुष आणि १०८ महिला).
• पंचायत समिती: एकूण ४५५ उमेदवार (२४१ पुरुष आणि २१४ महिला).