अंबाबाई देवीची महाविद्या श्री महाकाली माता रुपात पूजा
schedule29 Sep 25 person by visibility 122 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीची सोमवारी (२९ सप्टेंबर) महाविद्या श्री महाकाली माता रुपात पूजा बांधली. या पूजेचा इतिहास, सृष्टिचा लय करणे हे हिचे कार्य असून, सृष्टीच्या आरंभी हीच सर्वत्र व्याप्त होती. ब्रम्हदेवांनी मधु-कैटभांच्या वधासाठी श्री विष्णूंना जागृत करणेसाठी, योगनिद्रा महाकालीचीच प्रार्थना केली. तेव्हा विष्णूंच्या चेहरा, बाहू व ह्रदयातून हिचे तेज व स्वरूप प्रगटले. हीच महाकाली होय. अश्विन शुद्ध अष्टमीस हिची उत्पती मानली जाते. ही पहिली महाविद्या असून, हिचा महाकाल भैरव आहे, अश्विन कृष्ण अष्टमीला हिची उत्पती झाली. ही कालीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे.