उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रँड कोल्हापूरने निधी उभारावा-यशवंतराव थोरात
schedule18 Oct 25 person by visibility 31 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘जो समाज खेळात गुंतवणूक करतो तो शिस्त, संघभावना आणि यशाची प्रेरणा शिकवतो.महानता ही जात, धर्मावर अवलंबून नसते. कोल्हापुरातील उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रँड कोल्हापूर संयोजन समितीने कायमस्वरुपी निधी उभारावा. दानशूर व्यक्ती, संस्था, संघटनांनी यासाठी मदतीचा हात पुढे करावा.’असे आवाहन नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी केले.
आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ब्रँड कोल्हापूर २०२५’पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. याप्रसंगी, यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जेष्ठ टेबल टेनिसपटू शैलजा भोसले यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पॅरीस ऑलिंपिकमध्ये रोप्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे, साहित्यिक कृष्णात खोत, यूपीएससी परीक्षेतील गुणवंत बिरदेव डोणे, सचिन सुर्यवंशी, सौरभ पाटील, प्रशातं बीडकर, सागर बगाडे, मयूर कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. हॉटेल सयाजी येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या कला, क्रीडा, सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील ५२ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
‘ब्रँड कोल्हापूर’निधीसाठी थोरात यांनी स्वत: एक लाख रुपयांची देणगी दिली. तर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार सतेज पाटील यांनी पाच लाखाचा निधी जाहीर केला. आमदार पाटील म्हणाले, ‘२०१८ पासून आम्ही ब्रँड कोल्हापूर या संकल्पनेंतर्गत विविध क्षेत्रातील कर्तबगारांना गौरवित आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तुंग यश संपादन केलेल्या कर्तबगारांना सन्मानित करण्यात येते. संयोजन समिती सदस्य भरत दैनी यांनी स्वागत केले. प्राचार्य अजेय दळवी, पत्रकार अनुराधा कदम यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.कार्यक्रमाला बाळ पाटणकर, रविंद्र ओबेरॉय, डॉ.बी. एम. हिर्डेकर, अमरजा निंबाळकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, डॉ आर. एम. कुलकर्णी , रोटरीचे शीतल दुग्गे, निसर्गमित्रचे अनिल चौगले,पद्मा तिवले,अविनाश शिरगावकर उपस्थित होते.