Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समिती सदस्यपदी आनंद मानेउद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रँड कोल्हापूरने निधी उभारावा-यशवंतराव थोरातगोकुळच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीकास्त्र, हा विषय न समजण्यासारखाथेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता ? राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांना पलटवारआता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंदनोव्हेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा टप्पा तीन अभियानसातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी, केएमटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! कामगारांनी मानले आमदारांचे आभार!! उपकुलसचिव वैभव ढेरे यांना पितृशोक

जाहिरात

 

गोकुळच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीकास्त्र, हा विषय न समजण्यासारखा

schedule18 Oct 25 person by visibility 640 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "कपात केलेली डिबेंचरची रक्कम परत मिळावी या मागणीसाठी प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकांनी गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. मात्र वसुबारस गाय वासरू पूजन कार्यक्रमात गोकुळ मधील नेते मंडळींनी कपात केलेली डिबेंचरची रक्कम परत करण्यासंदर्भात  अवाक्षरही काढले नाही. डिबेंचर कपातीच्या विषयाला त्यांनी बगल दिली. नेते मंडळांची वक्तव्ये ही निराशजनक व दिशाभूल करणारी आहेत. त्याचवेळी गोकुळमध्ये सत्ता महायुतीचे आहे म्हणतात, चेअरमन महायुतीचा आहे असे सांगतात आणि त्याच गोकुळच्या व्यासपीठावर काँग्रेसचे आमदार हे महायुतीचे नेते मंडळी, मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीका करतात हे न  समजण्यापलीकडील आहे. गोकुळचा विषय दुसऱ्या दिशेने निघालाय " अशी रोखठोक मते प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादकांनी व्यक्त केल्या.
गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव,  धैर्यशील देसाई, प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी तानाजी पाटील, प्रताप पाटील कावणेकर, हंबीरराव पाटील, रविश पाटील कौलवकर,  संजय मगदूम  यांनी संयुक्तपणे शनिवारी सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी डिबेंचर कपातीचा विषय, गोकुळ कार्यालयात वसुबारस पूजन कार्यक्रमात नेते मंडळींनी केलेल्या राजकीय वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. गोकुळ प्रशासनाने व संचालकाने दिवेंचर कपाती संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही तर सहकार खात्याकडे न्याय मागू , त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर कोर्टात जाऊ. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादकांची संयुक्त बैठक लवकरच घेऊ संचालिका शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल असेही त्यांनी सांगितले. म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ केली त्याचे आम्ही स्वागत करतो.  आमची मुख्य मागणी डिबेंचरची रक्कम परत करा अशी होती मात्र त्या त्यासंबंधी नेत्यांनी अवाक्षरही काढले नाही. मर्यादेपेक्षा जादा डिबेंचर कपात करायला आमचा स्पष्ट विरोध आहे. पूर्वी दहा ते पंधरा टक्के रक्कम कपात केली जायची यंदा ४० टक्के रक्कम कपात केले आहे यामुळे प्राथमिक दूध संस्थांची दिवाळी यंदा गोड झाली नाही. गोकुळ दूध संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सर्वाधिक अंतिम दूध दर फरक दिला होता त्यावेळी म्हैस दुधाला दोन रुपये पन्नास पैसे तर गाय दुधाला एक रुपया 50 पैसे इतका दुध दर फरक दिला होता तत्कालीन चेअरमन अरुण डोंगळे यांच्या कालावधीतच गोकुळ दूध संघाचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला होता त्यांच्या कालावधीत अंतिम दूध दर फरकाची घोषणा झाली होती आणि वाटप करण्यात आले होते. मात्र आता हे मंडळी आपणच सर्वाधिक दूध दर फरक दिला असे . सांगतात. अरुण डोंगरे यांनी याबद्दल स्पष्टीकरण द्यायला हवे असे विश्वास जाधव म्हणाले.
तानाजी पाटील म्हणाले गोकुळवर जवाब दो हा मोर्चा राजकीय नव्हता प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकाने गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्याकडे नेतृत्व करावे अशी विनंती केली होती कारण गोकुळच्या  संचालकांनी डिबेंचर संदर्भात प्राथमिक दूध संस्थांचे म्हणणे ही ऐकून घ्यायला तयार नव्हते. मोर्चा काढण्यात येईल काही राजकीय हेतू नव्हता. मात्र गोकुळच्या कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी डिबेंचर कपाती संदर्भात काहीही बोलले नाहीत. दहा ते पंधरा टक्के  कपातीचा निर्णय योग्य आहे. मात्र मर्यादे पलीकडे जाऊन ज्यादा डिबेंचर कपातील आमचा विरोध आहे. असे पाटील यांनी सांगितले त्याचवेळी गोकुळ मध्ये महायुतीची सता आहे असे सांगितले जाते चेअरमन महायुतीचा आहे असे म्हणतात मग गोकुळच्या कार्यक्रमात गोकुळच्या व्यासपीठावर काँग्रेसचे आमदार महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीका करतात. हे सगळे न समजण्यापलीकडे आहे हा विषय दुसरीकडे निघाला आहे असे पाटील म्हणाले.  प्रताप पाटील कावणेकर म्हणाले , " डिबेंचर कपातीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता मात्र काही मंडळी जाणून-बुजून त्या मोर्चाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण काही जणांचे राजकारण महाडिक यांच्या नावाशिवाय चालत नाही. म्हणून ते ऊठसूटसूट महाडिक यांचे नाव घेतात. गोकुळमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी सत्ता परिवर्तन झाले. त्यानंतरही माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या या जावयाकडेच पुण्यातील गोकुळ दूध वितरणाचा ठेका राहिला. तो ठेका कोणी दिला ? शिवाय गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत 40 पैसे वाढीव दराने त्यांचा ठेका मंजूर केला आहे. यावरून महाडिक यांच्या जावयाचे काम उत्कृष्ट असल्याचे स्पष्ट होते. मात्र काही मंडळींच्या नजरेसमोर कायम महाडिक दिसतात. म्हणून कार्यक्रम कोणताही असू दे ते महाडिक यांचे नाव घेऊन बोलतात.
 गोकुळच्या राजकारणावरून संचालिका शौमिका महाडिक या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकत आहेत अशी टीका काही मंडळी करतात. मात्र ती टिका निरर्थक आहे. कारण गोकुळचे नेतेच व्यासपीठावर आपल्या बाजूला मिठाचे पोते  घेऊन बसतात. मिठाचे पोते बाजूला असल्यानंतर दूध नसणार नाही तर काय होईल अशी बोचरी टीकाही कावणेकर यांनी केली. गोकुळ वर निघालेल्या जनावरांच्या मोर्चामुळे मनाला ठेस लागली या मुस्लीपांच्या विधानावर बोलताना दूध उत्पादक म्हणाले डिबेंचर कपातीसाठी गोकुळ वर मोर्चा काढलेले हे जनावर पाळणारे शेतकरी माणसे आहेत. दूध उत्पादक शेतकरी आणि पशुधनावरच गोकुळ आहे त्यांच्या मागण्यांचे काय ?

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes