सात एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या सर्किटची उत्सुकता शिगेला
schedule01 Apr 23 person by visibility 715 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर:
भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत "सर्किट" चित्रपट सात एप्रिलपासून प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे.
स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे.
संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. रोमान्स आणि तगडी अॅक्शन या चित्रपटात आहे. सतत वैतागणाऱ्या, चिडणाऱ्या तरुणाची गोष्ट या चित्रपटात असल्याचं ट्रेलरमधून कळतं. पण तो असा का आहे? त्याच्यावर सतत मारधार करण्याची वेळ का येते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष चित्रपटातच मिळतील. त्यामुळे आता केवळ काहीच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.