लवकरच आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
schedule12 May 25 person by visibility 355 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात येईल,’ अशी घोषणा आरोग्यमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. दिलीप माने, सहाय्यक संचालक डॉ. नीलिमा सोनावणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात पहिल्याच वर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘परिचारिका हा व्यवसाय नसून एक व्रत आहे. या सेवेचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कोल्हापूर आणि मिरज भागात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध असून, कोल्हापूर जिल्ह्याला वैद्यकीय हब म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’ डॉ. विजय कंदेवाड यांनी प्रास्ताविक केले. डाी. पुरुषोत्तम मडावी यांनी आभार मानले.
…………………….
राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार विजेत्या परिचारिका : आधिसेविका गट - रमा गोविंदराव गिरी, जिल्हा रुग्णालय, बीड. आधिसेविका गट : डॉ. शुभांगी नामदेवराव थोरात, जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर. सहाय्यक अधिसेविका गट : आशा वामनराव बावणे, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली. सहाय्यक अधिसेविका गट : वंदना विनोद बरडे, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा, जिल्हा चंद्रपूर. सहाय्यक अधिसेविका गट : उषा चंद्रकांत बनगर, उपजिल्हा रुग्णालय, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. सार्वजनिक आरोग्य परिचारिका गट : ममता किशोर मनठेकर, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.
………………..
कोल्हापूर जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण - जीएनएम संवर्ग: प्रथम : कल्पना रमेश रत्नाकर, वसाहत रुग्णालय, गांधीनगर. द्वितीय : जयश्री रणवरे, सेवा रुग्णालय, कसबा बावडा. तृतीय : सुद्धा उत्तम बरगे, उपजिल्हा रुग्णालय, कोडोली. चतुर्थ : विद्या शशिकांत गिरी, सेवा रुग्णालय, कसबा बावडा. एलएचव्ही संवर्ग - प्रथम : उमा शहाजी बोते, प्राथमिक आरोग्य केंद्र, हुपरी. द्वितीय : गौरी केशव कारखानिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, बांबवडे. तृतीय : सुनिता धनाजी देसाई, प्राथमिक आरोग्य केंद्र, कडगाव. एएनएम संवर्ग - प्रथम : मनीषा भोपाल कांबळे, उपकेंद्र रुकडी, पी.आ.केंद्र हेर्ले. द्वितीय : अश्विनी शिवाजी वारके, उपकेंद्र म्हासरंग, पी.आ.केंद्र पाटगाव. तृतीय : मीता भिमसी पवार, उपकेंद्र बोरबेट, पी.आ.केंद्र गारिवडे. चतुर्थ : शुभांगी लक्ष्मण पाटील, उपकेंद्र तांबुळवाडी, पी.आ.केंद्र माणगाव