दहावीचा मंगळवारी ऑनलाइन निकाल ! मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्धता !!
schedule12 May 25 person by visibility 37 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंगळवारी, तेरा मे २०२५ रोजी ऑनलाइन जाहीर होणार आहे.
मंडळाच्या https ://results.digilocker.gov.in, https://sscresult.mahahsscboard.in, http://sscresult.mkcl.org, https ://results.targetpublications.org, https ://results.navneet.com, https ://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board- exams, https :// education. indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results, https://www.indiatoday.in/education-today/results, https ://www. aajtak.in/education/board-exam-results या संकेतस्थळावर निकाल जाहीर होत आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार, १४ मे ते २८ मे २०२५ या कालावधीत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल, त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल. फेब्रुवारी-मार्च मध्ये झालेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.