Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जनमत न मिळण्याची शंका असल्यानेच निवडणुकांबाबत चालढकल - आमदार सतेज पाटील लवकरच आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरशारंगधर देशमुख उतरले मैदानात, मंगळवारपासून शारंग चषक फुटबॉल स्पर्धा !दहावीचा मंगळवारी ऑनलाइन निकाल ! मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्धता !!यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक राज्यव्यापी दौऱ्यावर, नागपूर येथून सुरुवातमहात्मा बसवण्णांच्या वचनात मराठीतील प्रबोधन परंपरेचे मूळ – प्राचार्य राजेखान शानेदिवाणशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शाहू मानेंचा केआयटीत सत्कारसतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचे प्रीतीभोजन, खुलेपणाने रंगली राजकारणावर चर्चा !किसनराव मोरे ट्रस्टतर्फे पुरस्कार जाहीर, बुधवारी पुरस्कार वितरण समारंभकोल्हापूर उद्यम  सोसायटीच्या अध्यक्षपदी जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतार

जाहिरात

 

शारंगधर देशमुख उतरले मैदानात, मंगळवारपासून शारंग चषक फुटबॉल स्पर्धा !

schedule12 May 25 person by visibility 222 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील राजकीय घडामोडीपासून चर्चेत असलेले स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख आता फुटबॉलच्या मैदानात दिसणार आहेत. त्यांच्या पुढाकारातून शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. कै. वसंतराव जयवंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा होत आहे. श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर होत आहे. त्यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच शारंग चषक फुटबॉल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे शहरभर फलक प्रदर्शित केले आहेत. हे फलक चर्चेचे ठरले आहेत.

शारंगधर देशमुख यांनी महापालिकेत तीन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. २००५ पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत हॅट्‌ट्रिक साधली आहे. दोन वेळेला स्थायी समितीचे सभापतीपद, दहा वर्षे काँग्रेसचे महापालिकेतील गटनेतेपद भूषविले आहे.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती.  महापालिकेत काम करताना अभ्यासू व धडाडीचा नगरसेवक म्हणून त्यांनी छाप पाडली होती. महापालिकेत काँग्रेसचा गटनेता म्हणून पकड होती. सभागृहात विविध विषयावर आवाज उठवत प्रश्नांच्या सोडवणुकीवर त्यांचा भर असायचा.

दरम्यान सहा महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस पक्षाकडून ते इच्छुक होते. त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती.  दरम्यान तिकीट वाटपावरुन निर्माण झालेला पेच, त्यानंतर नगरसेवकांची सह्यांची मोहिम यावरुन नगरसेवकांत धुसफूस होती. शहर काँग्रेसमध्येही अस्वस्था होती.गेले काही दिवस ते काँग्रेस पासून दूर आहेत. शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) पक्षात जाण्याच्या चर्चा आहेत. त्यांच्यासोबत आठ ते दहा माजी नगरसेवक आहेत असा अंदाज आहे. मात्र ते शिवसेनेत जाणार की अन्य कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप ठरलेले नाही. ते सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतात. ते कोणत्या पक्षात जाणार  ? हे अधिकृतपणे जाहीर केले नाही. यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. सानेगुरुजी परिसरातील तीन प्रभागात त्यांचा वरचष्मा आहे.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर शहर काँग्रेसने पुन्हा एकदा पक्षाच्या नगरसेवकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवक दोन वेळा स्नेहभोजनानिमित्त एकत्र आले. मात्र या दोन्ही वेळेला देशमुख यांना आमंत्रण नव्हते.  ते काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला गेले नाहीत. दरम्यान सोमवारी (१२ मे) शहरात सगळीकडे ‘शारंग चषक’ फुटबॉल स्पर्धेचे फलक झळकले आहेत. त्यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच फुटबॉल स्पर्धा होत आहे. त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ फुटबॉल स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेचे आयोजन श्री नेताजी तरुण मंडळ करत आहे. तेरा मे २०२५ पासून या फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला एक लाख ५१ हजार रुपये व चषक तर  द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला एक लाख रुपये व चषक असे बक्षीस आहे. वैयक्तिक स्वरुपात खेळाडूूंना बक्षीसे आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes