हेल्मेट सक्तीबाबत प्रशासनाने जनसंवाद करावा
schedule23 May 23 person by visibility 285 categoryलाइफस्टाइल

शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रशासनाने वाहनधारकांना हेल्मेट सक्ती करण्याअगोदर जनसंवाद आयोजित करावा. लोकांची मते विचारात घेऊनच त्याच्यावर निर्णय घ्यावा. हेल्मेटसक्तीच्या नावाखाली दडपशाही खपवून घेणार नाही’अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांना निवेदन दिले.
लोकांना आवश्यक सुविधा पहिल्यांदा उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्पीड ब्रेकर, झेब्रा कॉसिंग, पार्किंग सुविधा याकडेही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, दत्ताजी टिपुगडे, धनाजी दळवी, रघुनाथ टिपुगडे, राजू जाधव, राजू यादव, संजय जाधव, मंजित माने, राहुल माळी, सुशिल भादिंगरे, दीपाली शिंदे, प्रिती क्षीरसागर आदींचा सहभाग होता.