महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला निश्चित! संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार !!
schedule29 Dec 25 person by visibility 286 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गेले दोन-तीन दिवस मॅरेथॉन बैठका, नेते मंडळींच्या सोबत चर्चा यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला अखेर निश्चित झाला. भारतीय जनता पक्ष 37, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 14 या पद्धतीने जागावाटप ठरल्याचे खात्रीशीर होत आहे. यामध्ये एक- दोन जागेची अदलाबदल होऊ शकते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी 29 डिसेंबर 2025 रोजी महायुतीच्या जागावाटपांची अधिकृत घोषणा होणार आहे. तसेच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवायची असा निर्णय नेते मंडळींनी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने गेले काही दिवस जागा वाटपावरती चर्चा सुरू होती. तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींनी अधिकाधिक जागा वाटपावर दावा केल्यामुळे चर्चा लांबत गेली सोमवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर हे बैठकीला काही वेळ उपस्थित होते. जवळपास चार तास बैठक चालली. वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ हे फोनद्वारे या बैठकीत सहभागी होत होते. जागा वाटपाच्या अनुषंगाने झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार अमल महाडिक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी अमित हुक्केरीकर, माजी महापौर सुनील कदम, प्रा. जयंत पाटील, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, शहराध्यक्ष विजय जाधव, रत्नेश शिरोळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी 81 जागा वाटपा संदर्भात सविस्तर चर्चा झाली पक्षनिहाय ताकतीचा अंदाज घेण्यात आला. तसेच प्रभागनिहाय उमेदवारांची ही चर्चा झाली. प्राथमिक माहितीनुसार भारतीय जनता पक्षाला सदतीस जागा शिवसेनेला 30 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाला 14 जागा या पद्धतीने जागावाटप ठरल्याचे वृत्त आहे. या आकडेवारीमध्ये प्रत्येक पक्षनिहाय एखादी- दुसरी जागा कमी -जास्त होऊ शकते.