चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांना अभिवादन
schedule28 Dec 25 person by visibility 38 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांच्या स्मृतिदिना निमित्य रविवारी रंगबहार च्यावतीने अभिवादन करण्यात आले. चित्रकार, प्राचार्य अजेय दळवी यांनी पद्माराजे उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी धनंजय जाधव, विजय टिपुगडे, बबन माने, गजेंद्र वाघमारे,शैलेश राऊत,नवज्योत काळे,राज इंचनाळकर, स्नेहल खराडे,पूनम मोरे,अवंती माने,शिवराज भोसले, श्रुती माणगावे,यांच्यासह कला महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराजांचे दरबारी चित्रकार आबालाल रेहमान यांचा हा पुतळा म्हणजे कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. देश विदेशात आबालाल रेहमान यांच्या कलाकृती गौरविल्या आहेत. कलाशाखेतील विद्यार्थ्यांनी आबालाल मास्तरांच्या कलाकृतींचा अभ्यास करावा ही काळाची गरज बनली आहे, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील कलाकारांनी आबालाल रेहमान यांचा आवडत्या रंकाळा परिसराची निसर्ग चित्र रेखाटली.