काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, चौदा उमेदवार घोषित
schedule28 Dec 25 person by visibility 193 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या दुसऱ्या यादीमध्ये आठ प्रभागातील 14 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी ही यादी प्रसिद्धीस दिली आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जाती गटातून माजी नगरसेवक सुभाष बुचडे यांना तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून पुष्पा निलेश वरुटे यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण महिला गटातून रूपाली अजित पोवार धामोडकर यांना तर सर्वसाधारण गटातून सचिन हरीष चौगले उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक पाच मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून विनायक कृष्णराव कारंडे, सर्वसाधारण महिला गटातून सरोज संदीप सरनाईक, स्वाती सागर येवलुजे यांची उमेदवारी घोषित झाली. प्रभाग क्रमांक नऊ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून नंदकुमार किरण पिसे यांची उमेदवारी जाहीर झाली. प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण गटातून संदीप सुभाष सरनाईक तर प्रभाग क्रमांक १३ मधून सर्वसाधारण गटातून दीपक बबनराव थोरात यांची उमेदवारी जाहीर झाली. प्रभाग क्रमांक पंधरामधून अनुसूचित जाती गटातून रोहित शिवाजीराव कवाळे यांची उमेदवारी घोषित झाली. प्रभाग क्रमांक 16 मधून सर्वसाधारण महिला गटातून धनश्री महेश कोरवी व पद्मावती काकासाहेब पाटील यांची उमेदवारी घोषित केली. प्रभाग क्रमांक 17 मधून नागरिकांचा मागास प्रवर्गटातून सचिन मारुती शेंडे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये एकूण 62 उमेदवारांची घोषणा केली.पहिल्या टप्प्यात 48 उमेदवारांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीमध्ये 14 उमेदवारांचा समावेश आहे. दुसरी यादी 28 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आली.