Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळची दूध संस्थांसाठी जुनी मिल्को टेस्टर मशीन बायबॅक योजनापुस्तकातून नितीमूल्यांची शिकवण, अनुभवांची शिदोरी - कवी डॉ. दिलीप कुलकर्णीगोकुळचे संचालक राजेंद्र मोरे यांचे निधनकाँग्रेसची दुसरी यादी जाहीर, चौदा उमेदवार घोषित राहुलच्या माध्यमातून इंगवले कुटुंबीयांचे राजकारण -समाजकारणात नवे पर्व – रविकिरण इंगवलेसुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्टचा विद्यार्थीहिताचा उपक्रम ! विवेकानंद संस्थेला तीन शालेय बसेस देणार ! !चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांना अभिवादनकृष्णराज महाडिकांची महापालिका निवडणुकीतून माघार महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - वंचित - आप एकत्र ! 21 उमेदवारांची घोषणा, 81 जागा लढणार !! अभ्यासूवृत्तीला समाजकार्याची जोड, लोकांच्या प्रश्नाविषयी तळमळ

जाहिरात

 

गोकुळची दूध संस्थांसाठी जुनी मिल्को टेस्टर मशीन बायबॅक योजना

schedule29 Dec 25 person by visibility 20 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे प्राथमिक दूध संस्थांची  दुधातील फॅट, एस.एन.एफ तपासणीचे जुने (मिल्को टेस्टर) मशीन कंपनीना बायबॅक (पुनर्खरेदी) करून नवीन दूध तपासणीचे अॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेमधील सहभागी गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांना नवीन अॅनालायझर मशीनचे वाटप चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

चेअरमन मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ दूध संघाची ओळख ही दुधाच्या दर्जेदार गुणवत्तेमुळे निर्माण झाली आहे. ही गुणवत्ता कायम राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गोकुळमार्फत सातत्याने केले जात आहे. दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाच्या गुणवत्तेनुसार योग्य मोबदला मिळाला पाहिजे, हाच गोकुळचा मुख्य उद्देश आहे. दूध संकलनाच्या वेळी फॅट व एसएमएफ तपासणी अचूक होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गोकुळच्या संलग्न सर्व प्राथमिक दूध संस्थांनी दूध तपासणीसाठी आधुनिक आणि विश्वासार्ह यंत्रणा वापरणे गरजेचे आहे. अनेक संस्थांकडे आजही जुनी किंवा विना वापर पडलेली फॅट तपासणी व अॅनालायझर मशीन आहेत. अशा मशीनमुळे तपासणीत अचूकता येत नाही आणि पारदर्शकतेवरही परिणाम होऊ शकतो. या योजनेअंतर्गत प्राथमिक दूध संस्थांना नवीन मशीन खरेदी करताना तीन हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत सवलत मिळणार असून, तीन वर्षांची वॉरंटीही देण्यात येणार आहे.

      संचालक विश्वास पाटील म्हणाले, दुग्ध व्यवसायामध्ये दूध तपासणी मशीन असो वा दूध काढणी मशीन, त्यांची स्वच्छता व नियमित देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे. मशीनची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती करणे, दररोज स्वच्छ पाण्याने योग्य प्रकारे वॉशिंग करणे आवश्यक असून, त्यातूनच मशीन अधिक काळ टिकते तसेच दूध तपासणीत अचूकता मिळते. याप्रसंगी संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मिल्कोटेस्टर विभागाचे प्रमुख बाजीराव मुडूकशिवाले, डॉ.एम.पी.पाटील उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes