शिक्षक बँकेत प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात
schedule26 Jan 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन येथील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत उत्साहात साजरा करण्यात आला. संचालक एस. व्ही. पाटील यांच्या हस्ते बँकेच्या प्रधान कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.‘राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून सध्याच्या संचालक मंडळाने घेतलेले सभासदाभिमुख धोरणात्मक निर्णय व बँक कर्मचाऱ्यांचे योगदान यामुळेच आश्वासक काम करू शकलो.’असे उद्गगार संचालक पाटील यांनी काढले. बँकेचे सेवानिवृत्त सभासद नारायण वडाम, एम. डी. पाटील, शंकर सुतार यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम, वसुली अधिकारी धनाजी भोईटे, आयटी हेड शशिकांत जाधव, अतंर्गत तपासणीस राजेंद्र चौगुले, शाखाधिकारी शशिकांत म्हेतर, राजेंद्र नादवडेकर, शहाआलम पाटील आदी उपस्थित होते.