महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट
schedule25 Jan 26 person by visibility 42 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका पदासाठी इच्छुक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. मंत्री पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ रविवारी, (२५ जानेवारी २०२६) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.सकाळी त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले. दरम्यान महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुती अंतर्गत भाजपला पहिल्यांदा महापौर मिळणार अशी चिन्हे आहेत. भाजपकडून महापौरपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. नगरसेवक विजय खाडे यांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन महापौरपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. खाडे हे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. संघटनात्मक कामात आघाडीवर असतात. माजी नगरसेवक किरण शिराळे यांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली. माजी नगरसेवक शिराळे यांचे चिरंजीव विशाल शिराळे यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. विशाल शिराळे हे तरुण आहेत. ओबीसी प्रवर्गातून निवडून आले आहेत. दरम्यान रविवारी, सकाळी खाडे व शिराळे यांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्री पाटील हे गडहिंग्लजकडे रवाना झाले. दुसरीकडे भाजपकडून महापौरपदासाठी नगरसेवक खाडे, शिराळे, नगरसेविका रुपाराणी निकम, नगरसेवक प्रमोद देसाई, वैभव कुंभार, विजय देसाई अशी नावे चर्चेत आहेत.