पाचगावच्या समाजकारण-राजकारणातील उच्चशिक्षित आश्वासक चेहरा
schedule25 Jan 26 person by visibility 71 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राशी त्या निगडीत. उच्चशिक्षित आहेत. कायद्याची पदवी घेतली आहे. समाजकार्याची आवड आहे. सासरचं पाटील कुटुंबीय तर पाचगावच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात आघाडीवर. आपसूकच, समाजकार्य व राजकारणातील कामाची व्याप्ती आणखी वाढली. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी अल्पावधीतच छाप उमटविली. पाचगावच्या समाजकारण-राजकारणातील आश्वासक चेहरा म्हणून अॅड. याज्ञसेनी महेश पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे. आता त्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत. कमळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.
पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा कोल्हापूर शहरानजीकचा. या जिल्हा परिषद मतदारसंघात पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, तामगावचा समावेश. ही सगळी गावे शहरालगतची. या गावामध्ये नागरिकीकरण वाढत आहे. शहरालगत असलेल्या या गावात विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, शहरालगतची गावे म्हणून नियोजनबद्ध विकास, लोकांच्या वाढत्या आशा, आकांक्षा या साऱ्यांची त्यांना जाणीव आहे. अॅड याज्ञसेनी महेश पाटील या बीए एलएलबी आहेत. ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून काम करत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा अनुभव आहे. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राची आवड असल्यामुळे लोकसंपर्क, लोकांच्या लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा यासंबंधी त्यांना जाणीव आहे. कोरोना काळात त्यांनी लोकांना वैद्यकीय सुविधा मिळवून दिल्या. लोकांना आरोग्य सेवा, उपचारासाठी प्रयत्न केले. महत्वाचं म्हणजे, कोरोना कालावधीत लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनातील जे जे घटक, यामध्ये पोलिस, सुरक्षा कर्मचारी काम करत होते. या घटकांना अन्नाची पाकिटे पुरविली. त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
२०२२ मधील ग्रामपंचायत निवडणुकीत त्या निवडून आल्या. पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांची लोकांशी नाळ जुळलेली. लोकसंपर्कही मोठा होता. त्यांच्या समाजकार्य व राजकीय वारसा महेश पाटील पुढे चालवित आहेत. भाजपमधून ते सक्रिय आहेत. अॅड. याज्ञसेनी पाटील या पती महेश पाटील यांच्या सोबतीने मतदारसंघात विविध कामे केली आहेत. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून विकास निधी उपलब्ध करुन विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. भागातील लोकांच्या सुखदुखात समरस होणारे कुटुंब म्हणून पाटील कुटुंबीयांची ओळख आहे. पाचगावसह मोरेवाडी, उजळाईवाडी, तामगाव येथे ही त्यांचा लोकसंपर्क आहे. लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्या आपली उमेदवारी लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. त्यांच्या उमेदवारीला प्रतिसाद मिळत आहे.