रेडिओलॉजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. पल्लवी पाटील, सचिवपदी डॉ. स्नेहा मोटे
schedule25 Jan 26 person by visibility 11 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर रेडिओलॉजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. पल्लवी पाटील, सचिवपदी डॉ. स्नेहा मोटे, उपाध्यक्षपदी डॉ. मनिषा ढेकळे आणि डॉ. शर्मिला रानडे यांची निवड करण्यात आली. २०२६ या वर्षासाठी ही कार्यकारिणी घोषित केली. हॉटेल सयाजी येथे हा पदग्रहण समारंभ झाला.
या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फिटल मेडिसिनतज्ज्ञ डॉ. प्रतिमा राधाकृष्णन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा झाला. डॉ. राधाकृष्णन या फिटल मेडिसिनमधील आंतरराष्ट्रीय फॅकल्टी असून, त्या 'फिटल मेडिसिन फाऊंडेशन इंडिया'चे प्रतिनिधित्व करतात. अन्य कार्यकारिणी सदस्य डॉ. चिन्मयी चिटणीस, डॉ. वर्षा गावडे, डॉ. नवनाथ ढोणे, डॉ. भूपेंद्र पाटील आणि डॉ. युगंधर पाटील आहेत. ‘कोल्हापूरशी असणारी सामाजिक बांधिलकी जोपासत येणाऱ्या वर्षात रेडिओलॉजी क्षेत्रात विविध शैक्षणिक उपक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचा कृती आराखडा राबवणार आहे.’असे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमांमुळे कोल्हापूरमधील रेडिओलॉजिस्टना अद्ययावत तंत्रज्ञानाची आणि ज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त असोसिएशनच्या माध्यमातून भरीव सामजिक कार्य करणार असल्याचे डॉ. पल्लवी पाटील यांनी सांगितले.