आंतरशालेय खो-खो स्पर्धेत टेंबलाईवाडी विद्यालयाचे वर्चस्व
schedule25 Jan 26 person by visibility 17 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे घेतलेलय आंतरशालेय खोखो स्पर्धेत टेंबलाईवाडी विद्यालयाने ११ व १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या या स्पर्धेत ११ वर्षे खालील गटामध्ये मुलांच्या अंतिम सामन्यात टेंबलाईवाडी विद्यालयाने महात्मा फुले विद्यालयाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले तसेच मुलींच्याही गटात अंतिम सामन्यात टेंबलाईवाडी विद्यालयाने महात्मा फुले विद्यालयाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. १४ वर्षे खालील वयोगटात टेंबलाईवाडी विद्यालयाच्या मुलांच्या संघाने नेहरूनगर विद्यालयावर मत करत विजेते पद पटकावले. मुलींच्या अंतिम सामन्यातही नेहरूनगर विद्यालयाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. विजयी सर्व संघास मुख्याद्यापक विलास पिंगळे, क्रीडा शिक्षक अशोक गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक सुनील परीट, अर्चना हासुरे, स्वाती लंगडे. युवराज एरुडकर, प्रभाकर लोंखंडे, प्रकाश गावडे. मनीषा पांचाळ यांचे प्रोत्सहन लाभले