चार्टर्ड अकौंटंटसच्या अध्यक्षपदी तस्लीमअरीफ मुल्लाणी, उपाध्यक्षपदी नितीन हरगुडे
schedule29 Feb 24 person by visibility 298 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी आणि स्टुडंटस असोसिएशनच्या अध्यक्षपदी तस्लीमअरीफ मुल्लाणी यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी नितीन हरगुडे, कोषाध्यक्षपदी आशिष भोसले यांची निवड करण्यात आली.
कोल्हापूर शाखेच्या कार्यकारी समितीची बैठक मंगळवारी झाली. २०२४-२५ या कालावधीसाठी कार्यकारिणी समितीची निवड झाली. आयसीएआयच्या कोल्हापूर शाखेच्या व्यवस्थापकीय समिती सदस्यपदी आशिष सेवेकरी, सुशांत गुंडाळे, अमित हिरवे यांची निवड झाली. नूतन अध्यक्ष मुल्लाणी यांनी आशिष भोसले यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. संस्थेचे ६५० सीए सभासद आहेत.