दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर
schedule06 Oct 24 person by visibility 208 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. तारि भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे झालेल्या बैठकीत भवाळकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदासाठी यंदा डॉ तारा भवाळकर, साहित्यिक बाबा भांड, विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग , निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, विचारवंत विनय हर्डीकर, लेखिका मेघना पेठे, समीक्षक 20 वि. स.जोग यांची नावे चर्चेत होती. यामधून दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलना अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्षा उषा तांबे यांनी या निवडीची घोषणा केली.
भवाळकर यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरासंत साहित्य, एकांकिका लेखन अशा विविध विषयावर विपुल लेखन केले आहे. एक एप्रिल 1939 रोजी जन्मलेल्या भावाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. महिलांच्या जाणीव जागृती विषयी त्यांनी लेखन केले आहे. आयुष्यभर संशोधन, लेखन यामध्ये कार्यरत आहेत. वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका म्हणूनही त्या परिचित आहेत. भवाळकर या सांगलीच्या आहेत. विविध पुरस्काराने त्या सन्मानित आहेत.