फोंडाघाटत टँकरला आग
schedule04 Dec 24 person by visibility 493 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : फोंडा घाट येथे बुधवारी, (३ डिसेंबर) टँकरने पेट घेतला. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टँकरने अचानक पेट घेतला. या मार्गावर दोन्ही बाजूनी वाहतूक काही वेळ थांबली होती. वाहनांच्या रांगा लागल्या. आग आटोक्यात आणली जात आहे. दाजीपूरपासून काही अंतरावर ही घटना घडली आहे.