Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
करवीर पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा ! सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील, उपसभापतिपदी भाजपच्या दिपाली पाटील वालावलकर हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र बनसोडे यांना  जाहीरगोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा गडहिंग्लजमध्ये सत्कारअनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषणशहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्सस्त्रियाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक : डॉ. मीना शेंडकरकॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड

जाहिरात

 

करवीर पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा ! सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील, उपसभापतिपदी भाजपच्या दिपाली पाटील

schedule10 Mar 26 person by visibility 167 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर पंचायत समितीवर महायुतीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला. सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताप्पा धोंडीराम पाटील तर उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या दिपाली संजय पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. मंगळवारी, दहा मार्च २०२६ रोजी पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. या सभेच्या अध्यक्षस्थानी करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार होते. गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांची  उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने २४ पैकी सोळा जागा जिंकल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सात, भारतीय जनता पक्षाने सहा तर शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला होता. नूतन सभापती साताप्पा पाटील हे परिते पंचायत समिती गणातून तर दिपाली संजय पाटील या पाचगाव पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत. करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापतीपदी भाजपच्या दिपाली पाटील यांना संधी मिळाली आहे. दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes