गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा गडहिंग्लजमध्ये सत्कार
schedule10 Mar 26 person by visibility 16 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ यांनी दैनंदिन दूध संकलनाचा २० लाख लिटरचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडल्याबद्दल गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा गडहिंग्लज यंथे सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध दूध संस्था चेअरमन, संचालक, सचिव तसेच दूध उत्पादक सभासदांच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम नुकताच पार पडला.
‘गोकुळ दूध संघाच्या प्रगतीत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या सहकार्यामुळेच हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणे शक्य झाल्याची’ भावना यावेळी व्यक्त केली. तसेच भविष्यातही दूध उत्पादकांना अधिक चांगल्या सुविधा देत संघाची प्रगती अधिक वेगाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतिश पाटील, प्रकाश पताडे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, संतोष पाटील, महेश सलवादे, बाळासाहेब कुपेकर, जितेंद्र शिंदे, कृष्णराव वाइंगडे, बाळासाहेब मंचेकर, बंटी पाटील, दिपक जाधव, जयसिंग चव्हाण, मुन्ना नाईकवडे, अशोक पाटील, शिवाजीराव करीगार, राकेश पाटील, सचिन देसाई, राजेश पाटील, शिवाजीराव शेंडगे, मलगोंडा पाटील उपस्थित होते.