संजय घोडावत इन्स्टिट्यूट अंतर्गत स्वच्छ भारत अभियान श्रमदान
schedule01 Oct 23 person by visibility 366 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आयएसआर सेल अंतर्गत अतिग्रे गावात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदान करण्यात आले. उपक्रमासाठी सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थीसह सगळयांना मास आणि हॅण्डग्लोज देण्यातआले. गावचे सरपंचश्री. सुशांत वड्ड यांच्या हस्ते 'स्वच्छता अभियान' "श्रमदान" कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच छाया उत्तम पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, संजय घोडावत इन्स्टिट्यूट मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. पी एम पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, प्रा. विशाल तेली, सौरभ फडतरे, विद्यार्थी प्रतिनिधी, ऋषी बेचारा, वेगवेगळ्या विभागाचे विद्यार्थी, विद्या मंदिर अतिग्रे शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.