सुशितो एंटरप्राइजला मानाचा अच्युअर्स पुरस्कार, दिल्तीतील समारंभात सुधाकर तोडकरांनी स्विकारला अॅवार्ड !!
schedule02 Feb 25 person by visibility 168 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
भारतातील पावर टूर क्षेत्रातील नंबर एक कंपनी स्टॅन्ली ब्लॅक अँड डेकर लिमिटेडने २०२४ या वर्षासाठी अच्युअर्स अॅवार्ड हा मानाचा पुरस्कार कोल्हापुरातील सुशितो एंटरप्राइजला प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे एक फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमात अॅवार्ड वितरण झाले. यानिमित्त सुशितो एंटरप्राइजेसचे सुधाकर तोडकर यांनी आपल्या कर्मचारी व ग्राहकांचे आभार मानले.तसेच कंपनीचे कोल्हापूर विभागाचे चेतन पाटील यांचे देखील विशेष सहकार्य मिळाल्याचे सांगितले.
ओरिजनल मशीन्सची विक्री व ओरिजनल स्पेअर पार्ट्स वापरल्यामुळे सुशितोने ही प्रगती साध्य केल्याचे त्यांनी नमूद केले.
कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर इंडिया व साऊथ एशिया चे प्रमुख राधेशजी वर्मा यांनी याप्रसंगी बोलताना सुशितोने विक्रीचे उद्दिष्ट तर साध्य केलेच व स्पेअर पार्ट व सर्विसमध्ये देखील चांगली प्रगती केल्याचे सांगितले.