सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव शुक्रवारपासून, तीन दिवस सांगितीक मेजवानी
schedule15 Jan 25 person by visibility 25 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अमृतमहोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यावतीने १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव होत आहे. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात हा महोत्सव रोज सायंकाळी ५.३० वाजता सुरु होईल. या महोत्सवात दिग्गज गायक कलाकार गानसेवा सादर करणार आहेत अशी माहिती पंडित विनोद डिग्रजकर व डॉ.उदय कुलकर्णी यांनी दिली.
महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. रसिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. शुक्रवारी (१७ जानेवारी), पंडित धनंजय हेगडे यांचे गायन होणार आहे. त्यांच्या गायकीवर किराणा व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा प्रभाव आहे. त्याच दिवशी दुसऱ्या सत्रात पंडित रघुनंदन पणशीकर यांचे गायन आहे. ते विविध रागांसोबत अभंग, गझल, ठुमरी सादर करणार आहेत. शनिवारी (१८ जानेवारी), संतोषकुमार नहान यांचे व्हायोलियन वादन होईल. याचदिवशी दुसऱ्या सत्रात पंडित विनोद डिग्रजकर यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे. डिग्रजकर हे आकाशवाणी संगीत स्पर्धेतील राष्ट्रपती सुवर्णपदक विजेते आहेत. शास्त्रीय व सुगम गायनावर त्यांचा भर आहे.
रविवारी, (१९ जानेवारी) शौनिक अभिषेक यांचे गायन आहे. आग्रा, जयपूर घराण्याच्या गायकीचा प्रभाव आहे. दुसऱ्या सत्रात शृती सडोलीकर-काटकर यांचे गायन आहे. त्या संगीत विशारद आहेत. त्या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांनी विविध ठिकाणी गायन सेवा केली आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित होते.