Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेजमध्ये शुक्रवारी डॉ. अच्युत  गोडबोले  यांचे  व्याख्यान  प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच करा- शिक्षक संघाची शिक्षणाधिकाऱ्यांच्यासोबत बैठककोल्हापुरात दोन दिवसीय कंदमुळे-औषधी वनस्पतींचा उत्सवकोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर नेणारा खासदार सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव शुक्रवारपासून, तीन दिवस सांगितीक मेजवानीएसटीच्या जागेवर प्रत्येक जिल्हयात रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील रुग्णालयासंबंधी सादरीकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्रिकेटची सामने, संतोष जोशी, अतुल आकुर्डे, सचिन सांगावकरांनी लुटला फलंदाजीचा आनंदसुरेंद्र जैन परिवारातर्फे सीपीआरला एक हजार चष्मे प्रदानश्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रमआंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!

जाहिरात

 

कोल्हापुरात दोन दिवसीय कंदमुळे-औषधी वनस्पतींचा उत्सव

schedule15 Jan 25 person by visibility 86 categoryलाइफस्टाइल

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरात 18 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत कंदमुळे व औषधी वनस्पतींचा उत्सव आयोजित केला आहे अशी माहिती कोल्हापूर वुई केअरचे मिलिंद धोंड व निसर्ग अंकुरचे उपाध्यक्ष प्राचार्य अशोक वाली यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
  निसर्ग्ग अंकुरच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर व एनजीओ कम्पॅशन 24 या संस्थेतर्फे आयोजन केले आहे. दसरा चौक येथील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा उत्सव होत आहे. यामध्ये 100 व अधिक कंदमुळांचे आणि दीडशेहून अधिक औषधी वनस्पतींचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसेच फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या  50 पेक्षा अधिक वनस्पती या प्रदर्शनात असतील. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, शहाजी कॉलेजचे प्राचार्य आर के शानेदिवाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रदर्शनामध्ये कंदमुळे, औषधी वनस्पती व फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या वनस्पती या स्वतंत्रपणे तीन विभागात मांडल्या जाणार आहेत. या प्रदर्शनात सताप, गुग्गुळ कुसर, कोष्ट, कोलीजंन, लक्ष्मी तरु, सागर गोटा, बेडकी पाला अक्कलकारा, दमवेल काजरा या दुर्मिळ औषधी वनस्पती असतील. तसेच कनगा, काटे कणगा, कोराडू,  करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेडवेल आळशी शेवाळा सुरण या वनस्पतींची कंदमुळे असणार आहेत.
 कंद मुळापासून विविध खाद्यपदार्थ कसे बनवले जातात त्याच्या पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील. तसेच विविध पदार्थांची चव चाखता यासाठी खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. काही कंदमुळे विक्रीसाठी असतील. रानभाज्या वृक्ष आणि औषधी वनस्पतींची माहिती असणारे पुस्तके विक्रीसाठी प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत
 लेटेस गेट बॅक टू अवर रुटस या ब्रीद वाक्याचा अंगीकार करून हे प्रदर्शन भरवले आहे. नागरिकांनी शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, कोचरमन अमृता वासुदेवन आहेत. निसर्ग संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मधुकर बाचुळकर, मंजिरी कपडेकर, सुप्रिया भस्मे, सुशील रायगांधी ,अभिजीत पाटील आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes