Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रारबाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेशसमूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: कुलपती जिष्णू देव वर्मागोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करा - भरत रसाळेगोकुळमधील वाद चिघळला : प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात घोषणा, दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चासंयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळतर्फे शिवजयंती महोत्सववेताळमाळ तालीम मंडळ ठरला सतेज चषकाचा मानकरी ! दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद !!विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रेंचा कार्यालयीन प्रवेश धुमधडाक्यात

जाहिरात

 

विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!

schedule17 Apr 26 person by visibility 42 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : शिक्षक म्हणजे केवळ नोकरी नव्हे तर शिक्षण क्षेत्राची सेवा, विद्यार्थ्यांची जडणघडण या वृत्तीने काम करतात. ज्ञानार्जनाचा वसा आयुष्यभर चालवितात. अशा शिक्षक वर्गात शोभणारे व्यक्तिमतव् म्हणजे प्रा. विनय गजानन पाटील ! मात्र त्यांची ओळख इतक्यापुरतीच सिमीत नाही. विद्यार्थीप्रिय शिक्षक, उत्तम वाचक, वक्ते आणि प्रगतशील शेतकरी म्हणून ते सर्वपरिचीत आहेत. शिक्षण आणि शेती या दोन्ही क्षेत्रात उत्कृष्टतेची पेरणी करण्यावर त्यांचा भर राहिला.

 येथील महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील तब्बल ३६ वर्षाच्या शिक्षकी सेवेनंतर येत्या ३१ मे २०२६ रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, शेती, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून १७ एप्रिल २०२६ रोजी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. कळंबा येथील अमृतसिद्धी सांस्कृतिक भवन येथे शुक्रवारी, सायंकाळी ४.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सपत्नीक गौरव होणार आहे. यानिमित्त प्रा. पाटील यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील विविध पैलू उलगडताना शिक्षण क्षेत्रातील हा आयडॉल्स समोर उभा राहतो.

१९९० मध्ये ते, महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे ऑटो इंजिनीअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी शिक्षकी पेशा केवळ नोकरी म्हणून स्वीकारला नाही. तर शिक्षण हे व्रत मानून काम केले. आपसूकच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले.किमान कौशल्य विभागाचे प्रमुख म्हणून कुशलतेने काम पाहिले. शेकडो विद्यार्थ्यांना टू व्हिलर मेकॅनिक व्यवसायात उतरविण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले. शिक्षण आणि शेती असा दुहेरी वारसा त्यांना लाभला.त्यांचे वडील, गजानन बळवंत पाटील हे गोटखिंडीतील प्रगत शेतकरी. कृषिभूषण पुरस्कारांनी सन्मानित. तर प्रा. पाटील यांचे चुलते म्हणजे श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे माजी चेअरमन व महाराष्ट्र हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी. बी. पाटील.

 या दोघांच्या मार्गदर्शनाखाली जडणघडण झालेल्या प्रा. पाटील यांनी विविध क्षेत्रात ठसा उमटविला. प्रा. पाटील यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण हे गावी अर्थात गोटखिंडी येथे झाले. नववीपासून पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरात आले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतले.न न्यू कॉलेजमधून बारावी तर न्यू पॉलिटेक्निकमधून ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. १९९० मध्ये नोकरीला सुरुवात केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्यातर्फे ‘गुणवंत शिक्षक’हा पुरस्कार दोनदा देऊन गौरविले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथेही त्यांनी विविध  जबाबदाऱ्या खुबीने पेलल्या. संस्थेचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांना वाचनाची आवड आहे. तसेच ते उत्तम वक्ते आहेत. त्यांनी विविध विषयावर व्याख्याने दिली आहेत. कोणत्याही स्वरुपाचे मानधन न घेता त्यांची व्याख्याने झाली आहेत. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात सक्रिय असताना ज्या त्या संस्थेचे ‘आधारवड’ बनले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes