Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करा - भरत रसाळेगोकुळमधील वाद चिघळला : प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात घोषणा, दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चासंयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळतर्फे शिवजयंती महोत्सववेताळमाळ तालीम मंडळ ठरला सतेज चषकाचा मानकरी ! दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद !!विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रेंचा कार्यालयीन प्रवेश धुमधडाक्यातकोल्हापुरातही शिवसेनेने दुसरे मंत्रीपद द्यावे - सुजित चव्हाण नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे, निष्ठेला योग्य न्याय मिळतोजिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरीकोल्हापुरात पंधरा एप्रिलपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला

जाहिरात

 

गोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली

schedule16 Apr 26 person by visibility 120 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अवसायानातील  प्राथमिक दूध संस्थांच्या पात्रतेवरून गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी आली आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यामध्ये या प्रकरणावरून शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी पाटील यांनी दुग्ध  विभागाचे सहाय्यक निबंधक सुजय कदम हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांचे  नातेवाईक आहेत असा आरोप दोन दिवसांपूर्वी केला होता. आमदार पाटील यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. आमदार पाटील यांनी आरोप करून दोन दिवस उलटण्याअगोदरच सहाय्यक निबंधक कदम यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कृष्णा सखाराम ठाकरे हे दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक असतील. ठाकरे हे सध्या शाहूवाडी येथे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक म्हणून काम करत होते. दरम्यान गोकुळशी संलग्नित सध्या बाराशेहून अधिक प्राथमिक दूध संस्थांच्या सुनावण्या सुरू आहेत. गर्जन संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी या संस्था अपाञ ठरवाव्यात अशी तक्रार सहकार विभागाकडे केली आहे. आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक दूध संस्थांच्या सुनावणी  झाले आहेत. त्यापैकी अडीशेच्या आसपास प्राथमिक दूध संस्थांच्या सुनावणीचा निकाल संबंधितांना कळविला आहे. दरम्यान आमदार शिवाजी पाटील यांनी याप्रकरणी तक्रार केल्यानंतर सहाय्यक निबंधक कदम यांना मंत्रालयात बोलावण्यात आले होते. कदम हे गुरुवारी दुपारीच मुंबईतून कोल्हापुरातील कार्यालयात दाखल झाले होते. दरम्यान गेले दोन दिवस सुनावण्यात थांबल्यामुळे गुरुवारी दुपारी प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी सहायक निबंधकाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये कागल आणि चंदगड तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes