संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळतर्फे शिवजयंती महोत्सव
schedule16 Apr 26 person by visibility 8 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संयुकत राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळतर्फे १६ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत शिवजयंती महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवतंर्गत व्याख्यन, शिवकालीन प्रसंगावर आधारित नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी, सोळा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आगमन सोहळा आहे. जनता बझार चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल. राजारामपुरी पहिली गल्ली मेन रोड , राजारामपुरी तालीम, मारुती मंदिर मार्गे नऊ नंबर शाळा मैदान असा मिरवणुकीचा मार्ग आहे. महोत्सव कालावधीतील सगळे कार्यक्रम छत्रपती राजाराम विद्यालय, शाळा नंबर नऊ येथील मैदानावर होणार आहेत. साऊंड सिस्टीमला फाटा देण्यात आला आहे.
शुक्रवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता प्रा. मधुकर पाटील यांचे ‘जगावे शिवरायांसारखे - लढावे शंभूराजासारखे’ या विषयावर व्याख्यान आहे. रात्री आठ वाजता संयुक्त राजारामपुरी परिसरातील नगरसेवक व मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. रात्री आठ वाजता साहिल भारती उज्वल फाऊंडेशन प्रस्तुत ‘राम भारत शिवायन’हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. शनिवारी, १८ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता कलाकार कला अकादमी कागल निर्मित ‘पावनखिंड, कोल्हापूरच्या मातीत घडलेला धगधगता इतिहास’ या नाटकाचे सादरीकरण आहे. रात्री आठ वाजता आविष्कार निर्मित रसिका तुझ्याचसाठी प्रस्तुत ‘जय महाराष्ट्’ हा कार्यक्रम आहे. रविवारी १९ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता स्केटिंग रॅलीने शिवज्योतीचे आगमन, सकाळी दहा वाजता शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता राजारामपुरी परिसरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आहे. रात्री ८.३० वाजता कलाकार कला अकादमी कागल निर्मित सुभेदार हे ऐतिहासिक नाटक होणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली. उत्सव मंडळाचे संग्रामसिंह निंबाळकर, कमलाकर जगदाळे, अभिजीत धनवडे, अंकुश निपाणींकर, संजय जाधव, संजय काटकर, किशोर खानविलकर, संजय कडवकर, दत्तात्रय गायकवाड, राजदीप भोसले, शंभोराज जगताप यांनी यासंदर्भाती माहिती दिली.